जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२५ । आषाढी एकादशी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्त अनेक वारकरी आषाढीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. जर तुम्हीही यापैकी असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. जळगाव, भुसावळ मार्गे विशेष गाड्या धावणार आहे. तर पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे १० जुलैपर्यंत पंढरपूर आणि मिरजसाठी ८० विशेष गाड्यांची सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह अन्य भागांतील भाविकांची मोठी सोय होणार आहे.

आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेने ८० हून अधिक विशेष गाड्यांची सोय केली आहे. नागपूर, अमरावती, भुसावळ आणि इतर अनेक स्थानकांवरून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे विभागातर्फे सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर-मिरज, न्यू अमरावती-पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष अशा एकूण ८० रेल्वे गाड्यांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान, रेल्वेच्या बरोबरीने राज्य सरकारने पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला असून त्याचा शासन आदेश निघाला आहे. त्यामुळे सोयीने प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शिवाय एसटी महामंडळ देखील प्रवाशांना बस सेवा पुरविणार आहे.
या रेल्वेगाड्यांची सेवा
नागपूर-मिरज : दि. ४ व ५ जुलैला सकाळी ८.३० वाजता सुटेल. दुसन्या दिवशी रात्री मिरज येथे ११:५५ वाजता पोहोचेल.
थांबे : वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग.
अमरावती ते पंढरपूर : दि.२ आणि ५ जुलै रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१० वाजता पोहोचेल.
थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्दुवाडी
खामगाव ते पंढरपूर : ३ आणि ६ जुलैला
खामगाव येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता पोहोचेल.
थांबे : जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्दुवाडी
भुसावळ पंढरपूर अनारक्षित : ५ जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी १:३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३:३० वाजता पोहोचेल.
थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडुवाडी









