⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

वारकऱ्यांनो लक्ष द्या ! आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी भुसावळ विभागातून धावणार ‘या’ गाड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यंदा पहिल्यांदाच पंढरीची वारी होणार आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या (Shree Vitthal-Rukmini) भेटीची ओढ लागली आहे. येत्या १० जुलै होणाऱ्या आषाढी वारीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून वारकऱ्यांसाठी चार गाड्या आणि त्यांचे प्रत्येक दोन फेरे अशा 16 गाड्या वारी विशेष म्हणून चालणार आहेत. या गाड्या नागपुर, नवी अमरावती व खामगांव येथून पंढरपुरसाठी आणि परत अशा चालणार आहेत. त्यांचे वेळा पत्रक आणि डब्यांची संरचना खालील प्रमाणे आहे.

1) 01115/16 नागपुर मिरज नागपुर विशेष

01115 नागपुर मिरज विशेष दिनांक 6 आणि 9 जुलैला नागपुर हुन सकाळी 8:50 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 7 आणि 10 जुलैला सकाळी 11:55 ला मिरजेला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01116 मिरज नागपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला दुपारी 12:55 ला मिरजेहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 8 आणि 11 जुलैला नागपुरला दुपारी 12:25 पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 डबे जोडण्यात येणार आहे.

2) 01117/18 नागपुर पंढरपुर नागपुर विशेष

01117 नागपुर पंढरपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला नागपुरहुन सकाळी 8:50 ला सूटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 8 आणि 11 जुलैला सकाळी 8:00 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01118 पंढरपुर नागपुर विशेष दिनांक 8 आणि 11 जुलैला संध्याकाळी 17:00 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 9 आणि 12 जुलैला नागपुरला दुपारी 12:25 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :– 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 जोडण्यात येणार आहे.

3) 01119/20 नवी अमरावती पंढरपुर नवी अमरावती विशेष

01119 नवी अमरावती पंढरपुर विशेष दिनांक 6 आणि 9 जुलैला नवी अमरावतीहुन दुपारी 14:40 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 7 आणि 10 जुलैला सकाळी 9:10 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01120 पंढरपुर नवी अमरावती विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला संध्याकाळी 19:10 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 8 आणि 11 जुलैला नवी अमरावतीला दुपारी 12:40 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 4 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 4 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 जोडण्यात येणार आहे.

4) 01121/22 खामगांव पंढरपुर खामगांव विशेष

01121 खामगांव पंढरपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला खामगांवहुन सकाळी 11:30 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 8 आणि 11 जुलैला पहाटे 3:30 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01122 पंढरपुर खामगांव विशेष दिनांक 8 आणि 11 जुलैला सकाळी 5:00 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 9 व 12 जुलैला खामगांवला संध्याकाळी 19:30 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

बे संरचना :– 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 जोडण्यात येणार आहे.

सर्व विठ्ठल भक्तांनी रेल्वेच्या ह्या वारी विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.