शनिवार, डिसेंबर 2, 2023

मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत

जळगाव लाईव्ह न्यूज ।15 जुलै २०२२ । जळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी पल्लवी भागवत यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यशासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी या संदर्भांत आदेश काढले आहेत.(pallavi bhagvat jalgaon kdmc)

राज्यशासनाकडून मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नत्या करण्यात आल्या असून यामध्ये कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्त पल्लवी अंकुश भागवत यांची जळगाव शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या दि.३ ऑगस्ट पर्यंत रजेवर असल्यामुळे त्यांचा रजेचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर पल्लवी भागवत ह्या जळगाव मनपात रूजू होणार आहेत.
तसेच यापुर्वी जळगाव महापालिकेतून जामखेड नगरपरिषदेला बदली झालेले उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची पिंप्री चिंचवड महापालिकेत उपायुक्त पदी नियुक्ती झाली असून जळगाव येथून बदलीवर बोदवड येथे गेलेले सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे यांची जळगाव जामोद येथे बदली झाली आहे. या बदल्याचे आदेश उप सचिव प्रियंका कुलकर्णी यांनी दि.१२ रोजी काढले आहेत.