जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापासून जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात अपघाताची मालिका सुरूच असून अशातच पुन्हा एका अपघाताची घटना समोर आलीय. महिंद्रा पिकअप वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाल्याची घटना पहूर नजीक सोनाळा फाट्याजवळ घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.
या अपघातात धर्मा बारेला (वय ३०), जितेंद्र बारेला (वय १६), सुभा राजू बारेला (वय १३), तुळशीराम बारेला (वय ३५), अनिल तोवरसिंग बारेला (वय ३०) हे गंभीर जखमी झाले. तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ९ जणांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.