पाचोरा शहरातील भडगाव रोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा स्वामी विवेकानंद नगर येथील एटीएम अज्ञात चोरट्यांनी आज (५ मे) रात्री 1.50 वाजता फोडून १५ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचा शिपाई अल्केश बापू न्हायदे (वय 33) यांच्या फिर्यादी तक्रार नुसार 3,4 इसम होत. आणि ते 25 ते 30 वयोगटातील असावे अंगात काळे शर्ट होते. आरडा ओरड केल्यावर आरोपी पसार झाले व सोबत आणलेली पिकअप गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारी नुसार आरोपीनी कॅबिन चा दरवाजा तोडला त्यात काच फुटला आणि आरोपी 15000 घेऊन पसार झाले अद्याप आरोपीची ओळख पटलेली नाही आहे. अज्ञात आरोपीन विरोधात कलम- 379,511,427 गुन्हा नोदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास मा पोलीस निरंक्षक किसनराव नजन पाटील याच्या आदेशाने उप पोलीस निरीक्षक विकास पाटील याच्या कडे दिला आहे.पुढील तपास चालू आहे.