गुन्हेजळगाव जिल्हा

Pachora : चोरट्याने पोलिसाला रक्तबंबाळ केलं, पण.. पाचोऱ्यामधील थरार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात आधीच चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले असून चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचं दिसतेय. अशातच पाचोरा शहरातील जारगाव चौफुली भागात चोरीच्या हेतुने दुकानाचे शटर तोडत असलेल्या आरोपीने रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसाच्या डोक्यात टाॅमी मारत प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय. सचिन पवार असे जखमी पोलिसांचे नाव असून जखमी अवस्थेतही सचिन यांनी आरोपीला पकडुन जेरबंद केलं. पोलिसाच्या या शौर्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिस नाईक सचिन पवार हे (ता. १७) रात्री शासकीय पोलिस वाहनावरून गस्त घालत असताना जारगाव चौफुली भागातील एका दुकानाच्या शटरचे कुलूप तोडताना डोक्यावर पगडी बांधलेला एक जण दिसल्याने त्यांनी गाडी थांबवली. तेव्हा संशयित तेथे उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसला. येथील एका ट्रकमध्ये त्याचा साथीदार लपून बसलेला होता.

या दोघांना सचिन पवार या पोलिस कर्मचाऱ्याने पकडण्याचा प्रयत्न केला असता पगडीधारक संशयिताने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी टॉमीने पोलिस कर्मचाऱ्यावर वार केला. त्यात त्यांच्या डोळ्यावरील कपाळावर गंभीर इजा झाली. तरीही पवार यांनी या चोरट्यास पकडून ठेवले. यावेळी त्यांच्यासोबत राहुल शेळके व गणपत जाधव हे दोघे होमगार्ड होते.

दोघांपैकी एकास पोलिस ठाण्यात आणले. दुसरा मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यास कजगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस हवालदार दिलीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अशोकसिंग बावरी (वय २२) यांचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button