उद्या शिवसेनेचे ताला ठोको आंदोलन

जून 6, 2021 7:18 PM

जुन महिना हा शेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असून या महिन्यात अत्यल्प पाणी असल्यावरही शेतकरी जिवाचे रान करुन ठिबकद्वारे कापूस पिक घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. तसेच शेतकऱ्यांना रात्री बे रात्री ठराविक वेळे पूरताच विद्यूत पुरवठा केला जातो. तो सुरु असतांना विद्यूत पुरवठा सुरळीत नसतो. कधी कधी तर कमी दाबाने विद्यूत पुरवठा होत असल्याने शेतीपंप चालत नाहीत व सतत पुरवठा खंडित होत असल्याने विद्यूतपंप जळण्याच्या घटना घडतात व याच महत्वाच्या दिवसात शेती कामे खोळंबली तर शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या हंगाम हातचा जाऊन स्वप्नांचा चुराडा होतो याचे एकमेव कारण म्हणजे विद्यूत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार.

shiv sena

विद्यूत वितरण कंपनीचे अधिकारी स्वत: चोवीस तास पंख्याखाली बसून कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसून असतात. एकही कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. या कारणांमुळे शेतकऱ्यांचा मानसिक छळ व आर्थिक नुकसान होते म्हणून ही समस्या वारंवार सांगूनही विद्यूत वितरण कंपनी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गेल्या मंगळवारी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र याबाबत विज वितरण कंपनीने कुठलीच दखल घेतल्याचे दिसुन येत नसल्याने दि. ७ जुन रोजी सकाळी ११ महावितरण कंपनीचा निषेध करत ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now