पाचोराराजकारण

महादेवाच्या पिंडीवर निष्ठेची शपथ घेणारे बदलले, जि.प.सदस्यासह १०० समर्थक शिंदे गटात दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला (Shiv Sena)आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे पाचोरा (Pachora) तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील (Raosaheb Patil) यांच्यासह १०० समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ घेतली होती. तरी देखील त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीमाना द्यावा लागला होता.मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यातील अनेक निष्ठावन नेते शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला मोठा झटका बसत आहे.

जळगावात देखील शिंवसेनेला खिंडार पडलं आहे. काही दिवसापूर्वीच जळगावमध्ये शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पाचोऱ्यात देखील शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. रावसाहेब पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला होता. हा प्रवेश सोहळा अधिकृतरित्या आज पाचोरा शहरात आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी पार पडला. माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या जिल्हा परिषदेचा संपूर्ण गट म्हणजेच त्यांच्या १०० समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, रावसाहेब पाटील यांची कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. तालुकाप्रमुख ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा प्रवास आहे. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार यांनी बंड पुकारल्यानंतर स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडेवर हात ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याची शपथ घेतली होती.

यावेळी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होते. मात्र या निष्ठेच्या शपथ घेण्याला काही दिवस उलटत नाही तोच रावसाहेब पाटील हे आज शिंदे गटात सहभागी झाले असून विविध चर्चांना उधाण आलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button