---Advertisement---
पाचोरा

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पाचोरा पालिकेची दंडात्मक कारवाई

pachora (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असून यात सकाळी ७ ते ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु करण्याची परवानगी आहे. अस असतानाही पाचोरा शहरात ११ नंतर सुरु असलेल्या दुकानदारांवरती पाचोरा नगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

pachora (1)

शहरातील गंगा सुपर शॉपी यांना 5000/-, हॉटेल गुरुकृपा रु.5000/-, शितल स्विटस 500/- आदी दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे Non-Eccencial ज्यांना परवानगीच नाही उदा.कापड दुकान,चप्पल बुटाची दुकाने, केशकर्तनालये, रेडिमेड कापडाची दुकाने, नामे पायल /हितेश ड्रेसेस 10,000/-, सिजर्स ॲड रेझर्स केशकर्तनालय 5000/- इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आला.

---Advertisement---

तसेच शहरात विनामास्क फिरत असलेल्या नागरीकांकडून व कोवीड 19 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा-या नागरीक, दुकानदार यांचेकडून एकंदरीत रुपये 56000/- मात्र रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यांनी केली कारवाई मुख्यधिकारी – नगरपालिका ‘सी ई ओ’ शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यांत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, राजेंद्र शिंपी, विलास देवकर, प्रकाश गोसावी, फायरमन भागवत पाटील,विजेंद्र निकुंभ,पोलिस प्रशासनाकडून नंदकुमार जगताप, सुनील पाटील, बापु महाजन, प्रकाश पाटील व महिला होमगार्ड न.पा.तर्फे अनिल वाघ, प्रशांत कंडारे, भिकन गायकवाड, किशोर मराठे, संदीप जगताप, सुभाष बागुल, प्रकाश लहासे आदी अधिकारी व सह कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---