---Advertisement---
गुन्हे धरणगाव

संतापजनक! दिराकडूनच वहिनीचा विनयभंग, धरणगाव पोलिसांत गुन्हा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । मद्याच्या नशेत दिरानेच आपल्या वहिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पिडीत महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon crime 1 1 jpg webp

पिडीत महिलेने आपल्या दोघं दिरांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलेली होती. याचाच राग धरून ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दारूचा नशेत घरात प्रवेश करीत आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली?, दिलेली तक्रार मागे घे. नाहीतर तुला सोडनार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, तुझ्या मुलीला गुंड लावून मुंबईला उचलुन घेऊन जाऊ व तुम्हाला समाजात तोंड दाखविण्यास लायक ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीता ही १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आंघोळ करीत असतांना दुसरा दीर हा गुपचुप पाहत होता. ही गोष्ट पिडीतेच्या मुलीने बघतातच त्याने तिथून पळ काढला होता.

---Advertisement---

अशा प्रकारे संशयित आरोपींनी वेळोवेळी आपल्या वाहिनीचा वेळोवेळी विनयभंग केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ उमेश भालेराव हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---