⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

वन्यजिव सप्ताहाचे आयोजन, प्राण्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रअंतर्गत  येणाऱ्या चारठाणा वनपरीमंडळातील मौजे चारठाणा, वायला, टाकळी येथे वन्यजिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून १ ते ७ ऑक्टोबर हा सप्ताह वनविभागाकडून वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो.

नागरिकांमध्ये प्राण्यांबद्दल जागरूकता म्हणून जंगलातिल वन्यजिवांबद्दल माहीती व महत्त्व स्थानिक लोकांना देण्यात आली. १ ते ७ ऑक्टोबर हा कालावधी वन्यप्राणी यांचा प्रजनन म्हणुन ओळखला जातो. तृणभक्षी प्राण्यांच्या जिवावर मांसभक्षी प्राणी यांचे जिवन अवलंबुन असते. परीसरातील जंगलात हरिण, निलगाय, चितळ, सांबर, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा,सायळ, माकड,अस्वल यासह पट्टेदार वाघांचं वास्तव असुन वन्यप्राणी जगविणे आपला अधिकार व कर्तव्य आहे.

याबाबत ग्रामस्थांना माहीती देतांना वनपाल डि.जी.पाचपांडे, वनरक्षक डि एस पवार, आर एल आसुरे, सोपान पाटील ग्रामस्थ देवानंद ठाकरे, प्रमोद कोळी, गंगाराम कोळी, संतोष कोळी, विनोद इंगळे, संतोष वानखेडे, रमेश पाटील उपस्थित होते.