⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | एमबीबीएस भारतातील व विदेशातील संधीवर सेमिनारचे आयोजन

एमबीबीएस भारतातील व विदेशातील संधीवर सेमिनारचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । वैद्यकीय तसेच इतर विविध क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या असंख्य संधींची माहिती देण्यासाठी खान्देशातील एकमेव स्टडी अब्रोडची अधिकृत जळगाव शाखा ‘मोक्ष ओवरसीज’तर्फे २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड, जळगाव येथे सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. मोहिनी चटर्जी या मराठी भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तर मोक्ष ओवरसीजचे सीईओ धनंजय शाह प्रश्नांची उत्तरी देतील.

आज ‘नीट’ची की आन्सर शीट वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. याद्वारे नीट दिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्कोअरचा अंदाज येईल. नीट परीक्षेनंतर वैद्यकीय क्षेत्रात आपले भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न असतात. त्यांचे उत्तर देण्यासाठी व त्यात असलेल्या उपलब्ध संधीबद्दल माहिती देण्यासाठी या सेमिनारचा फायदा होऊ शकतो. भारतात दरवर्षी १६ लाख विद्यार्थी नीट ची परीक्षा देतात, परंतु भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ८०,००० सीट्स उपलब्ध असतात. एक किंवा दोन मार्कांच्या फरकाने मुलांची संधी चुकते, तसेच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये डोनेशन जास्त असल्यामुळे क्षमता आणि गुणवत्ता असूनही मुलांना एमबीबीएस करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी विना डोनेशन व वाजवी खर्चात विदेशातील इंग्रजी भाषेत शिक्षण देणाऱ्या अनेक युनिव्हर्सिटीज उपलब्ध आहेत. त्याबद्दल या सेमिनारमध्ये मोक्षचे सीईओ धनंजय शहा व कौन्सिलर मोहिनी चटर्जी मराठी भाषेत माहिती देणार आहेत. मोक्ष ओवरसीजने नाविन्यपूर्ण असे ॲप विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कस अनुसार, भारतातील उपलब्ध कॉलेजेस व फी स्ट्रक्चर याबद्दल माहिती देण्यासाठी बनवले आहे. या ॲपद्वारे आपण वेगवेगळ्या विद्यापीठांची फी, सिलेक्शन प्रोसेस व कोटा या सर्व माहिती घेऊ शकतो. ॲप बद्दल माहितीही या सेमिनारमध्ये देण्यात येईल.
कोविडच्या नियमानूसार सेमिनारमध्ये लिमिटेड बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांना सेमिनारमध्ये प्रवेश दिला जाईल. नाव नोंदणी करीता मोक्ष ओवरसीजच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव शाखेचे रैय्यान जहागीरदार व योगेश जैसवाल यांनी केले आहे.

author avatar
Tushar Bhambare