जळगाव लाईव्ह न्युज । १७ मे २०२२ । श्री जैन रत्न युवक परिषदेतर्फे उन्हाळी सुट्टी निमित्त दिनांक 26 मे ते 5 जून या कालावधीत जैन धर्मिक व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते १०.३० या वेळेत रतनलाल सी बाफना जैन, स्वाध्याय भवन, जैन भवन, औद्योगिक वसाहत, सागर भवन, दादावाडी आणि गणेश कॉलनी येथे हे शिबिर होणार आहे.
वय सहा वर्ष व अधिक असणाऱ्या मुला-मुलींसाठी हे शिबिर असून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संघपती दलुभाऊ जैन यांनी केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी महेश भंडारी व मनोज संचेती जिनेश्वर डोशी यांच्याशी संपर्क साधावा असे परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे.