जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२२ । शहरात महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती उत्सव निमित्ताने दि. ३ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी महामारी दूर झाल्यामुळे महात्मा बसवेश्वर यांची जयंती ढोल ताशा घोडाबग्गी व लिंगायत बांधवांच्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन आनंदाने महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात येणार आहे. यात सायंकाळी चार वाजता शास्त्री टॉवर, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी पुतळा, नेहरू चौक, शास्त्री टॉवर या मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०.३० वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय प्रतिमापूजन व सकाळी ११ वाजता मनपा कार्यालय इथे.प्रतिमापूजन करण्यात येणार आहे.
सर्वांनी सहपरिवार इष्ट मित्रांसह हजर राहावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष संदीप बाळकृष्ण वाणी,उपाध्यक्ष गजानन आप्पा आकाशे, सचिव संदिपआप्पा मिटकरी, समिरआप्पा गुळवे, विशालआप्पा लिंगायत, सतिषआप्पा आंबेकर, अमोलआप्पा तोडकर, अजयआप्पा बारसे, कृण्णाआप्पा गवळी(गठरी) यांनी केले आहे.