जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । येथील रोटरी क्लब जळगाव, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, प्रभाकर पाटील हॉस्पिटल व पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानतर्फे मोफत तिरळेपणा तपासणी, शस्त्रक्रिया व पापणी पडणे यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. तुषार फिरके यांच्या हॉस्पिटलमध्ये १४, १५ व १६ एप्रिल रोजी रुग्णांची पूर्व प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नेरी नाक्याजवळील प्रभाकर पाटील हॉस्पिटलात २२, २३ व २४ एप्रिल रोजी हे मोफत शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. शिबिरासाठी पुणे येथून डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. भांगे, डॉ. वनारसे, डॉ. राजेश पवार व २० तज्ज्ञ डॉक्टर्स येणार आहेत. रोटरी क्लब जळगावचे हे पाचवे शिबिर तर पुणे नेत्रसेवाचे १७७ वे शिबिर आहे, असे रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी व प्रकल्प प्रमुख डॉ. तुषार फिरके यांनी कळवले आहे.