⁠ 
शुक्रवार, ऑगस्ट 2, 2024

चितोडा येथे श्री हनुमान मंदिर शताब्दी महोत्सवनिमित्त सप्ताहाचे आयोजन, ग्रामस्थांना दररोज महाप्रसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । गोपाळ भारुडे । यावल तालुक्यातील चितोडा येथे श्री हनुमान मंदिर शताब्दी महोत्सव दिनानिमित्त संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि.९ एप्रिलपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून १६ एप्रिलला कार्यक्रम समाप्त होणार आहे. विशेष म्हणजे आठवडाभर संपूर्ण गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रम असा
रोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ८.३० ते ११.३० श्री रामायण कथा, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ७.३० ते १० हरी कीर्तन होईल. तसेच दररोज सायंकाळी ४ ते ६ गाव जेवण राहिली.

प्रसिद्ध कीर्तनकारांची मांदियाळी
९ रोजी ह.भ.प.श्री. कन्हैया महाराज, १० रोजी ह.भ.प.श्री. सदाशिव महाराज, ११ रोजी ह.भ.प.श्री. रामेश्वर महाराज, १२ रोजी ह.भ.प.श्री.योगेश महाराज, १३ रोजी ह.भ.प.श्री. नारायण महाराज, १४ रोजी ह.भ.प.श्री. दीपक महाराज, १५ रोजी ह.भ.प.श्री.भरत महाराज, १६ रोजी ह.भ.प.श्री.राजेंद्र महाराज.

या कार्यक्रमाची सांगता दि. १६ रोजी होणार आहे. या दिवशी सायंकाळी दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे.

सकाळी अल्पोपहाराचे आयोजन दीपक भंगाळे, किशोर धांडे, पाटील वाडा, काई. हरी इच्छाराम पाटील सह परिवार, राहुल नाशिक क्लासमेट, क्रांतिवीर मित्र मंडळ, पुंडलिक धांडे, रामचंद्र टोंगळे यांनी केले आहे. तर सायंकाळी गाव जेवणाचे आयोजन राजेंद्र कुरकुरे, भीमराव बोंडे, खान्देश मित्र मंडळ, रवींद्र पाटील, पंढरी भंगाळे, लतेश पाटील, पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे.

सप्ताहास गावातील तरुणांचा पुढाकार
या कार्यक्रमाला गावातील युवा तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना निर्बंधामुळे श्री हनुमान मंदिर शताब्दी महोत्सव होऊ शकला नव्हता. मात्र गेल्या आठवड्यापासून राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटविण्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावातील स्वप्नील धांडे याने पुढाकार घेत सर्व युवकांना हाताशी घेऊन शताब्दी महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरविले. नियोजनानुसारच सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.