जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । जपानची राजधानी टोकियो येथे २४ जुलै ते ०९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारताकडून १०० हून अधिक खेळाडू क्वलीफाय झाले आहेत. यात महाराष्ट्रातून ०८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये राही सरनोबत (शूटिंग २५ मी. पिस्तोल), तेजस्विनी सावंत (शूटिंग ५० मी. रायफल), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), प्रवीण जाधव (आर्चरी), चिराग शेट्टी (बॅडमिंटन दुहेरी), विष्णू सरवानन (सेलिंग), तसेच पॅरालिंपिकमध्ये स्वरूप उन्हाळकर (पैराशुटींग १० मी.) व सुयश जाधव (पॅरास्विमिंग ५० मी.) यांचा समावेश आहे.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढावा याकरिता #Cheer4India या अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाचे एकलव्य क्रीडा संकुल जळगांव सुद्धा सहभागी झाले आहे.
एकलव्य क्रीडा संकुल जळगांव हे उत्तर महाराष्ट्र विभाग तसेच खान्देशातील अग्रगण्य असे क्रीडा संकुल म्हणून प्रसिध्द आहे. या केंद्रात सदैव खेळाडूंना प्रोत्साहित केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतातील तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंकरिता #Cheer4India हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमास के.सी.ई. सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रसिद्ध उद्योगपती हरिष मिलवानी, के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक नितीन चौधरी, के.सी.ई. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. रंजीत पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे देवेंद्र इंगळे व एकलव्य चे सर्व प्रशिक्षक विद्यार्थीतसेच खेळाडूवर्ग उपस्थित होते. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व मू.जे. महाविद्यालायचे क्रीडा संचालक तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर तसेच सर्व सभासदांनी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.