---Advertisement---
नोकरी संधी भुसावळ

भुसावळात रोजगार मेळाव्याचे आयोजन ; 10वी/ITI/12वी/पदवीधरांना संधी..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ आणि समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 09.00 वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव येथे करण्यात आलेले आहे.

job fair jpg webp

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन 10वी, 12 वी/ सर्व शाखेतील पदवीधारक/आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए./ एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी 600 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.जिल्हयातील जैन फॉर्म फ्रेश जळगाव, युवा शक्ती नाशिक, हिताची ॲस्टीमो ब्रेक.प्रा.लि.जळगाव, किरण मशिनटुल्स जळगाव, फ्युचर टेक्स जळगाव,टी.डब्लयु.जे, जळगाव, जैन इंरिकेशन प्रा.लि, मानराज मोटर्सजळगाव,गोविंदा एच.आर.नाशिक अशा आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे.

---Advertisement---

मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांना ॲल्पाय करावे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र व बायोडाटासह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 09.45ते संध्या.06.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 0257 – 2959790 वर संपर्क साधावा असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---