---Advertisement---
चोपडा

चोपडा नगरपालिकेच्या नवीन जलवाहिनीच्या कामाला विरोध

chopda
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोधान योजने अंतर्गत नगरपालिकेला नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी ६५ कोटी मंजूर असून, कठोरा येथील तापीवरून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम काम सुरू आहे. नवीन जलवाहिनीमुळे शेतातील बागायती पिकांची नासाडी होत आहे. तसेच तापीवरून यापूर्वी शहराला पाणी पुरवठा करतांना पाण्याचा वारेमाप उपशामुळे परिसरातील भूजल पातळी खूप खोलवर गेली आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊन गावाच्या पाणी पुरवठ्यावर व शेतीच्या सिंचनावर देखील गंभीर परिणाम होणार असल्याने नगरपरिषदेच्या नवीन जलवाहिनीच्या कामाला कठोरा ग्रामस्थांसह शेतकरी संघटनेने विरोध केला आहे.

chopda

नगरपालिकेने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी कठोरा ग्रामपंचायत व ग्रामस्थांची कोणतीही परवानगी घेतलेली नसून तापीवरून पाणी पुरवठा करणारी जुनी जलवाहिनी अस्तित्वात असतांना .गावातून पाईपलाईन टाकण्याचा घाट बांधला जात आहे.

---Advertisement---

मालापूर येथील गुळ मध्यम प्रकल्पातून शहराला सध्या पाणी पुरवठा होत असून, गुळ धरणात मुबलक पाणी साठा असतांना कठोरा येथून दुसरी जलवाहिनी कशासाठी? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नगरपालिका प्रशासन गावकरी व शेतकऱ्यांच्या हिताचा व भावनांचा विचार न करता पाणी पुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनीचे काम करीत असेल याला ग्रामस्थांचा व शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध आहे.

मु क्र:१ ग्रामपंचायत कडून किव्हा गावकऱ्यांकडून  पाईप लाईनला कुठल्याही प्रकारची परवानगी नसून राजकिय आणि प्रशासकीय दबाव शेतकऱ्यावर टाकून एक प्रकारे दादागिरी करून शेतकऱ्याचे किव्हा गावकऱ्यांचे हक्काचे पाणी चोपडा नगर परिषद नवी पाईप लाईन टाकून पडवीत आहे.

मु क्र:२ गावकऱ्यांचा पाईपलाईनला विरोध नसून गावकरी याचे मागणे आहे की नगर परिषद बॅक वॉटर म्हणजे नदीपात्रात पाणी साठा दाखवा आणि पाणी घेऊन जा नाहीतर नदीमद्ये एक लहान 3 ते 4 फुटाचा बंधारा टाका जेणेकरून पाणी थांबेन त्यामुळे पाणी साचेल किंवा जिरेल त्यामुळे शेतकऱ्याचे देखील नुकसान होणार नाही

मु क्र :३ नगर परिषद पाईपलाईन शेतकऱ्याचा उभ्या पिकातून घेऊन जाणार आहे त्या पीक मद्ये केळी पपई  बाजरी भोई मूग मका ऊस   इत्यादी पिकाचे नुकसान देखिल शेतकऱ्यांना होणार आहे  तेवढेच नाही तर शेतीतील गोदाम कृषी फार्म व शेड याची देखील तोडफोड करून पाईपलाईन जाणार आहे आणि तेवढेच नाही तर त्या पाईप लाईन ला ज्या ठिकाणी जॉईन आहे त्या ठिकाणी  पाणी गळती मुळे जमीन माती ही क्षारयुक्त होंते आणि १ ते २ बिग्याचे क्षेत्राचे पिकाचे नुकसान होते आणि नगर परिषद कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देत नाहीत , फक्त खोटी आश्वासने नगर पालिका देते.

 

 

 

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---