⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कुऱ्हेपानाचे विकासोत नवख्या उमेदवारांना संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । कुऱ्हे पानाचे येथील विकासोच्या निवडणुकीत सर्व १३ संचालकांची अविरोध निवड झाली होती. यानंतर मंगळवारी चेअरमनपदाची माळ रवींद्र राजाराम गांधेले, तर व्हाइस चेअरमन पदाची माळ छगन तापीराम बारी यांच्या गळ्यात पडली.

सोसायटीत एकूण १३ संचालक निवडून द्यायचे होते. मात्र, ग्रामपंचायत सदस्य नाना पवार, माजी सरपंच सुरेश शिंदे यांच्या पॅनलमधील ६ आणि माजी चेअरमन राजेंद्र पाटील व सदस्य अरूण कोळी यांच्या पॅनलमधील ७ सदस्यांनी अर्ज भरले. त्यामुळे सर्व १३ संचालक बिनविरोध निवडले गेले. दोन्ही पॅनलने सर्व नवख्या उमेदवारांना संधी दिली. यानंतर चेअरमन, व्हाइस चेअरमन निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.डी.उचित यांनी काम पाहिले. त्यांना सचिव विलास टोंगळे, लिपिक विकास महाजन यांनी सहकार्य केले.

कर्जदार खातेदार प्रतिनिधी म्हणून भगवान दौलत रोनखेडे, भागवत तुकाराम महाजन, दिनकर रामदास पाटील, समाधान इंद्रजीत बारी, शिवाजी रामकृष्ण पाटील, भागवत दौलत शिंदे, प्रल्हाद शंकर पाटील, छगन तापीराम बारी, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी रवींद्र राजाराम गांधेले, महिला राखीव प्रतिनिधी तुळसाबाई मधुकर बारी, सुलोचना प्रभाकर बोबडे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी रमाकांत प्रकाश पाटील, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी नामदेव सखाराम सपकाळे.