⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | शहरात पोलीस चौकी,’दामिनी पथक’ कार्यरत करण्यासाठी वैशालीताई सुर्यवंशी यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन!

शहरात पोलीस चौकी,’दामिनी पथक’ कार्यरत करण्यासाठी वैशालीताई सुर्यवंशी यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। पाचोरा शहरातील एम. एम. महाविद्यालयाच्या परिसरात तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्यासाठी व शहरात कायमस्वरूपी ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यासाठी आज मा. पोलीस निरीक्षक, पाचोरा पोलीस स्टेशन यांना सौ.वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, श्री उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, श्री शरद पाटील तालुकाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

पाचोरा व भडगाव तालुक्यातून एम. एम. कॉलेज या ठिकाणीणी असंख्य मुली शिक्षणासाठी येत असतात.सदर परिसरात अनेक रोड रोमिओ कॉलेजच्या आजूबाजूला घोळक्याने उभे असतात व कॉलेज सुटल्यावर मुलींच्या मागे लाज वाटेल अशी वक्तव्य करून मुलींना त्रास देत असतात यामुळे अनेक मुली या मानसिक त्रासाला कंटाळून कॉलेजात येण्याचे टाळत आहेत म्हणून कॉलेज परिसरात हत्यारी महिला पोलिसांची चौकी कायमस्वरूपी सुरू करून शहरात दामिनी पथक देखील कार्यान्वित करावे असे निवेदन देण्यात आले.या निवेदनाची 25 ऑगस्ट पर्यंत दखल न घेतल्यास 26 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यक्रमात ‘बेटी बचाव आंदोलन’ करू असा इशारा पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी अँड दीपक पाटील शहरप्रमुख, मा.श्री अनिल सावंत शहर प्रमुख,मा.श्री.अँड अभय पाटील, भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, पप्पू जाधव, संजय चौधरी,गफार भाई, निखिल सोनवणे, जयश्री येवले, अनिता पाटील, मंदाकिनी पारोचे, कल्पना पुणेकर, पूजा पाटील, सीमा पाटील,मनीषा पाटील, ममता पाटील, संगीता पाटील, सौ.मालू पाटील, आबासाहेब भीमराव पाटील,खंडू सोनवणे, अरुण तांबे, नाना वाघ, अँड किशोर पाटील, नंदू पाटील (सर),गणेश पाटील, डी.डी नाना, शुभम पाटील, आकाश महाजन, चेतन भावसार आदी कार्यकर्ते तसेच विविध पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह