जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून आता पर्यंत अनेक सरकारे अली आणि गेली. मात्र शेतकऱ्यांना भाव मिळणं अतिशय कठीण झालं आहे. यातच एका शेतकऱ्याला ५१२ किलो मागे केवळ २ रुपये मिळाले आहेत. यामुळे याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.
तर झाले असे की, सोलापूर जिल्ह्यातील एक कांदा उत्पादन करणारा शेतकरी तब्बल 512 किलो कांदा घेऊन सातशे किलोमीटर प्रवास करून बाजार समितीमध्ये गेला. त्यावेळी या शेतकऱ्याला बरोबर 512 रुपये ,मिळले. पुढे जाऊन यासाठी लागणारे हमाल व इतर खर्च पहिला तर शेतकऱ्याला दोन रुपये पाचशे बारा किलो कांद्या मागे मिळाले. हे पाहून त्या शेतकऱ्याला रडू कोसळले.
राजेंद्र तुकाराम चव्हाण असे त्या शेतकऱ्याचे नाव असून १७ फेब्रुवारी रोजी ५१२ किलो कांदा विकण्यासाठी बाजार समितीत आणला. ५१२ किलो कांद्यासाठी त्यांना ५१२ रुपये मिळाले. त्यातून हमाली ४०.४५, तोलाई २४.०६, भाडा १५ रुपये, रोख उचल ४३० रुपये असे एकूण ५०९ रुपये ५१ पैसै वजा करण्यात आले. त्यानंतर त्यांना २ रुपये ४९ पैशांचा चेक देण्यात आला. या चेकवरही तारीख ८ मार्च २०२३ दिली आहे. दोन रुपयांचा हा चेक पाहून राजेंद्र चव्हाण यांना रडूच कोसळले.