फक्त एकनाथराव खडसे म्हणजे सर्व OBC नाही : महाजनांचा टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. एकनाथराव खडसे यांच्यावर पुन्हा गिरीश महाजन यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. यावेळी मुद्दा आहे तो ओबीसी आरक्षणाचा.
गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. खडसे म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं काहीही कारण नाही. यावेळी महाजन म्हणाली कि, माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या हे मी बघितलं नाही. पंकजाताईंची कुठेही नाराजी नाही. पक्षश्रेष्टी त्यांच्यावर गांभीर्यानं विचार करतील. त्यांनाही मोठं पद मिळेल.
गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदासाठी तू तू मै मै नं करता जिल्ह्याचा विकास करायला हवा असा टोला खडसेंनी लगावला होता. यावर बोलतांना गिरीश महाजन म्हणाले कि, आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका विकास अपोआप होईल.