⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकाच फोनवरून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास शक्य; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले ॲपचं उद्घाटन

एकाच फोनवरून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास शक्य; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले ॲपचं उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । जळगाव जिल्हा प्रशासन आणि ‘वोपा’ या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या ‘व्ही स्कूल’ या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोनामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील मुलांना ऑनलाईन अभ्यास करावा लागणार असल्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. इंटरनेटपासून ते अगदी अभ्यासासाठी वेळेत फोन मिळेपर्यंत अनेक गोष्टी यामध्ये असतात. या साऱ्याचा विचार करून ‘वोपा’ने ‘व्ही-स्कूल’ या ॲपची निर्मिती केली आहे. यात एकाच फोनवरून अनेक विद्यार्थी अभ्यास करू शकतील. यासाठी शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि प्रशासन सहकार्य करणार आहेत.

‘वोपा’ने गेल्या शैक्षणिक वर्षात वेबसाईटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले असून, गेल्या वर्षभरात सव्वा कोटी पेज व्ह्यूजसह ही वेबसाईट महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी वापरली आहे आणि आता मोफत ॲपच्या माध्यमातून ‘वोपा’ व जळगाव जिल्हा परिषद तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवत आहेत.

ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, प्रसिद्ध सिनेअभिनेते ललित प्रभाकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका दीपा देशमुख, अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, नाशिक शिक्षण विभाग उपसंचालक उपासनी उपस्थित होते

हे ॲप कसं डाऊनलोड करणार?
वोपा संस्थेच्या http://edu.vopa.in/learn/ या वेबसाईटला भेट देऊन हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे.

author avatar
Tushar Bhambare