जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । गुलाबराव देवकर नर्सिंग महाविद्यालयातर्फे एक विद्यार्थी एक झाड उपक्रम नुकताच राबविण्यात आला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी किंबहुना पर्यावरणाची ढासळती पातळी रोखण्यासाठी ऑक्सिजनपूरक झाडांची लागवड विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली. त्याच बरोबर वृक्षसंवर्धनाची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पर्यावरणाविषयी माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रा. ए. जेस्सी, प्रा प्रियांका भावसार, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.