जळगाव लाईव्ह न्यूज | ११ एप्रिल २०२२ । रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीस भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक देवून गंभीर दुखापत केल्याची घटना जुनी पोस्टल कॉलनी येथे घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार अनंत लढे (वय-५१) रा. जुनी पोस्टल कॉलनी, एम.जे. कॉलेजच्या मागे, जळगाव. हे बांधकाम व्यवसायिक आहे. दि ९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ते घरासमोरील रस्त्याने पायी जात होते यावेळी (एमएच १९ डिक्यू १४००) या दुचाकीने भरधाव वेगाने येवून तुषार लढे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार यांचा उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
रविवार १० एप्रिल रोजी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तुषार लढे यांच्या फिर्यादीवरून (एमएच १९ डिक्यू १४००) क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहेत.