⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | गॅस कटरद्वारे एटीएम फोडणाऱ्या टोळीतील एकाला अटक, सात पसार!

गॅस कटरद्वारे एटीएम फोडणाऱ्या टोळीतील एकाला अटक, सात पसार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यात गॅस कटरने एटीएम फोडत धुमाकूळ घालणार्‍या टोळीतील एका सदस्याला हरीयाणा राज्यातून गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच चोर्‍यांसाठी मदत करणार्‍या जामनेरच्या इसमालाही अटक करण्यात आली. आरोपीने बोदवडसह जामनेर व नेरीतील चोरीची कबुली दिली आहेत तर टोळीतील पाच ते सात साथीदार मात्र पसार आहेत.

रीस उर्फ कालू जलालू खान (खिल्लुका, ता.हातीन, जि.पलवल, हरीयाणा) व शेख शोएब शेख रफिक (मदनी नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावेत आहेत. जामनेर पोलिस ठाणे हद्दीत 43 हजार 500 तर कासोदा हद्दीत नऊ लाख 55 हजार व बोदवड शहरातून 31 लाख 10 हजार मिळून एकूण 41 लाख आठ हजार 500 रुपयांची रोकड गॅस कटरद्वारे एटीएम फोडून लांबवण्यात आली होती.

गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर जामनेरचे काही संशयीत हरीयाणा कापूस विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली तर काही हरीयाणा येथून जामनेरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेख शोएब शेख रफिक यास अटक करण्यात आली. संशयीताने आरोपींची नावे सांगितल्यानंतर पथकाने स्थानिक हरीयाणा पोलिसांच्या मदतीने वारीस खान यास अटक केली. आरोपींचे पाच ते सात साथीदार असून ते पसार झाले आहेत तर एक आरोपी तिहारच्या कारागृहात आहे.

जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवछे, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, दीपक पाटील, विनोद पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, कृष्णा देशमुख, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मुरलिधर पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह