जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीआकाराऊत येथून यात्रेहून परतत असतांना मध्यरात्री दीड वाजेच्या महामार्ग क्रमांक सहावर खडसे पंपालगत अज्ञात वाहनाने मोटार साईकलला दिलेल्या धडकेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घडली.
या अपघातात रत्नदीप कोचूरे हे जागीच ठार झाले असून संजय सोनार यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मयत रत्नदिप कोचुरे हे मुळचे जळगांव येथील असुन ते नगरपंचायत मुक्ताईनगर येथे कर्मचारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षाचा मुलगा आहे.नेहमी हसत मुख व मनमिळाऊ स्वभाव असलेला नगरपंचायत कर्मचारी अपघातात ठार झाल्याची वार्ता कळताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत पोलीसात नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.एकाच आठवड्यात या ठिकाणी अपघाताच्या दोन घटना घडल्या.काही दिवसांपूर्वी चिंचखेडा बु येथील एकाला जीव गमवावा लागला.तोच आज पुन्हा एकाला मृत्युने कवटाळले.