जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । ढालसिंगी येथे रविवारी आरोग्य कर्मचारी यांनी गावातील शंभर नागरिकांची आर.टी.पी.सी.आर(घश्यातील चाचणी) करून घेतली. गावात मागील काही दिवसांपासून करोना ने थैमान घातला असून व त्यात आठ दिवसा पूर्वी दोन मृत्यू झाल्याने आता नागरिक ही आरोग्य खात्याला सहकार्य करीत असताना दिसून येत आहे.

अगोदर नागरिक स्वब देण्यासाठी नकार देत असे. पण आरोग्य कर्मचारी व येथील ग्रा प सदस्य यांच्या जनजागृतीच्या जोरावर नागरिक मोठ्या प्रमाणाने चाचणी शिबीर ला स्वब देण्यासाठी येत आहे. गावात एक ते दोन दिवसाआड करोना रॅपिड चाचणी शिबीर होत होत असते. परंतु आज रविवार चा सुट्टीचा दिवस असूनही तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डॉ. विवेक जाधव व आरोग्य सेवक मनोज परदेशी यांनी गावात आर.टी.पी.सी.आर करोना चाचणी शिबीर आयोजित केले. आज ढालसिंगी येथे घेण्यात आलेल्या शिबिरात तब्बल शंभर लोकांनी आपले घश्यातील स्वँब दिले.
गावातील सर्वच स्तरावरून या दोन्ही आरोग्य कर्मचारी व आशा सेविका कांताबाई गोतमारे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. गावातील आरोग्य कर्मचारी व येथील ग्रा. प. सदस्य, संभाजी गोतमारे हे पॉझिटिव्ह रुग्णावर सतत लक्ष ठेऊन असतात. कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण गावात फिरत असताना आढळून आला तर त्याला सक्तीची ताकीद देऊन त्याला घरी किंवा शेतात राहण्याची सूचना देत असतात. व अश्याच प्रकारे तपासणी मोठ्या प्रमाणात गावात झाली तर नक्कीच गाव करोना मुक्ती कडे जाईल असा विश्वास आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केला.कोविड आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी येथील ग्रा. प. सदस्य संभाजी गोतमारे व विद्यानंद अहिरे यांनी परिश्रम घेतले.