पाय घसरून विहिरीत पडल्याने कलाली येथील एकाचा मृत्यू

एप्रिल 28, 2022 4:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । अमळनेर तालुक्यातील कलाली येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death 82 jpg webp

अधिक माहिती अशी की, बारकू चंद्र भिल (वय-४३) रा. कलाली ता. अमळनेर हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. भिल हे गुरे चारून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी २७एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले. यावेळी गावाच्या बाहेर असलेल्या एका विहिरीत पाय घसरल्याने ते खोल पाण्यात पडला. ही बाब सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान विहिरीच्या कपाऱ्यात अडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात येवून तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विशाल चव्हाण करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now