---Advertisement---
जळगाव जिल्हा

आपत्कालीन सेवा कौशल्य विकसित करण्यासाठी सतत वैद्यकिय प्रशिक्षण गरजेचे

---Advertisement---

उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बीएलएस आणि एसीएलएसवर सीएमई एकदिवसीय कार्यशाळेत तज्ञांचा सूर

upc 1

जळगाव – वैद्यकिय क्षैत्रात पारंपारीक उपचार पध्दतीबरोबर आधुनिक उपचारांचा उपयोग केल्यास जलद गतीने उपचार शक्य होत आहे आणि म्हणूनच आपत्कालील सेवा कौशल्य विकसित करण्यासाठी सतत वैद्यकिय प्रशिक्षण गरजेच असल्याचे मत तज्ञांनी आज डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, जळगाव खुर्द येथे बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) आणि अ‍ॅडव्हान्स कार्डिअ‍ॅक लाईफ सपोर्ट (एसीएलएसवर) या विषयावर सतत वैद्यकीय शिक्षण (सीएमई )विभागातर्फे एकदिवसीय कार्यशाळेत केले.यात विविध तज्ञांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शन केले.

---Advertisement---

उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,डॉ सी. कांते,डॉ. वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रेमचंद पंडीत, बालरोग प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर, भुलरोग विभागाचे प्रमुख डॉ. काशिनाथ महाजन, डॉ. अभिनय हरणकर,डॉ. धिरज चौधरी व समन्वय सचिव डॉ. देवेंद्र चौधरी यासह मान्यवर उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शारदापूजनाने हया कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख अतिथींचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देउन करण्यात आला.

प्रमुख मान्यवरांनी अशा प्रकारच्या कार्यशाळामधून अत्याधुनिक तंत्रज्ञाना बाबत तसेच ज्ञानात भर होते असे सांगितले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात चित्रफितीव्दारे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. धिरज अनिल चौधरी – बीएलएस,सीपीसीआर,सीओएल एस,एईडी, अनंत बेंडाळे आणि डॉ. ललित वसंत पाटील – बाल व नवजात पुनर्जीवन पेडीयाट्रीक सीपीसीआर,निओनाटल रेस्कशन, डॉ. वर्षा के. वारके एसीएल अ‍ॅडव्हाँन्स एअरवे डिफीब्रिलीटेर,लीना अनुज पाटील व डॉ. सुरज भोळे – हृदयविकारानंतर आयसीयू मधील रुग्णसेवा या विषयावर तर दुस—या सत्रात बीएलएस,सीपीसीआर,सीओएल एस,एईडी,(डॉ. धिरज चौधरी, डॉ. देवेंद्र चौधरी), एसीएल, प्रगत वायुमार्ग, एंडो-ट्रॅचियल इंट्यूबेशन,अ‍ॅम्बु बॅग-मास्क, ओटू डिलिव्हरी डिव्हाइसेस, (डॉ. वर्षा वारके, डॉ. शीतल फेगडे),ईसीजी आणि कार्डियाक अरेस्ट, टॅची-अ‍ॅरिथमिया, ब्रॅडी-अ‍ॅरिथमिया, ५एच व ५ टी, डी-फायब्रिलेटर (डॉ. ललित वसंत पाटील, डॉ. वेंकट सतीश पटीपाटी), व्हेल्टीलेटरर्सचा मूलभूत वापर (डॉ. लीना अनुज पाटील, डॉ. पूजा दरमवार)यांनी प्रात्यक्षीकाव्दारे प्रशिक्षण दिले.

हा कार्यक्रम वैद्यकीय व्यावसायिकांना जीवनरक्षक तंत्रज्ञानात कुशलता मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. ही कार्यशाळा समन्वयक सचिव डॉ. देवेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार सतत वैद्यकिय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आली. कार्यशाळेत जवळपास ३०० च्यावर प्रतिनीधीनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेतून २ क्रेडीत पाँईट प्रतिनीधींना प्रदान करण्यात आले. यशस्वीतेसाठी डॉक्टर,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment