जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथे शेताच्या बांधाच्या कारणावरून निखिल पंडित पाटील यांना दिनेश बबन पाटील राजेंद्र ग्यानसिंग पाटील रोहिदास ग्यानसिंग पाटील नारायण बबन पाटील प्रदीप गुलाब पाटील या पाचही आरोपींनी लाकडी दांड्याने मारहाण व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भाग.5 भादवि कलम 325, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार विकास देशमुख, पोलीस नाईक राजू पाटील, किरण पाटील हे पुढील तपास करीत आहे