---Advertisement---
गुन्हे चोपडा

गावठी कट्टा, चोरीच्या दुचाकीसह एक जेरबंद; एक फरार

chopda
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । चोपडा बस स्टँड परिसरातून एकाला बनावट देशी पिस्टल, जिवंत काडतुस व चोरीच्या दुचाकीसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रवीण भागवत कोळी (रा.बोरअजंटी ता.चोपडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव. 

chopda

दरम्यान, त्याचा साथीदार जगन बरेला (रा. जामठी ता.वरला जि. सेंधवा (म.प्र.)) फरार होण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

---Advertisement---

दोघा आरोपींविरुद्ध हे.कॉ.सुरज पाटील यांच्या फिर्यादीनुसार चोपड़ा शहर पोलिस स्टेशनला गु.र.न.101/ 2021तसेच आर्म अँक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपीस चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.रवींद्र गायकवाड, पो. हे.कॉ.अनिल देशमुख, पो.हे.कॉ.कमलाकर बागुल, पो. हे. कॉ.सुरज पाटील, पो.हे.कॉ. प्रदीप पाटील व चालक पो. हे. कॉ. राजेन्द्र पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---