जळगावात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला ठोकल्या बेड्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२४ । बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयिता शनीपेठ पोलीसांनी बेड्या ठोकल्या. विजय बाबूराव तायडे रा. वाल्मिक नगर, जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मिक नगरात सोमवारी रात्री संशयित आरोपी विजय तायडे हा बेकायदेशीरपणे हातात लोखंडी तलवार घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने तात्काळ वाल्मिक नगरात जावून संशयित आरोपी विजय तायडे याला अटक केली. त्याच्याजवळू लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.
ही कारवाई शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय खैरे, पो.कॉ. राहूल पाटील, अनिल कांबळे, राहूल घेटे, मुकुंद गंगावणे यांनी केली.