जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । मंजूर झालेले पीक कर्जाचा बोजा शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी 1360 रुपयाची लाच घेतला खाजगी पंटर जळगावच्या लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. भगवान दशरथ कुंभार (वय 44 रा. बांबरुड ता.पाचोरा जि.जळगाव) असं लाचखोर खाजगी पंटरच नाव असून या कारवाईने महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
नेमका काय आहे प्रकार?
तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.१२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता सदर कार्यालयात उपस्थित खाजगी पंटर भगवान कुंभार याने माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो असे सांगुन सदर कामासाठी तक्रारदार यांच्याकडे भगवान कुंभार याने १,३६०/-रुपये लाचेची मागणी केली
याबाबत तक्रारदार यांनी जळगाव शाखेच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली त्यानुसार पथकाने सापळा रचून बुधवारी १७ मे रोजी दुपारी संशयित आरोपी भगवान कुंभार याला लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.