जळगाव जिल्हा
शिक्षक दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केला शिक्षकांचा सन्मान
जळगाव लाईव्ह न्युज | ७ सप्टेंबर २०२१ | नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ५ सप्टेंबर २०२१च्या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन यावल शहरातील विविध भागात राहणारे गुरुजनांचे त्यांच्या घरोघरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. शहरातील साधारणपणे ७८ शिक्षकांना तथा सेवानिवृत्त शिक्षक शिक्षीकांचे या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले. त्या सन्मानित करण्यात आलेल्या गुरूवर्यांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी यावल नगरपरिषदेचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते एजाज देशमुख, हाजी फारुख मोमीन, गणेश महाजन, आशिष पाटील, शब्बीर तडवी, गणेश जोशी, मोसिन कुरेशी, भरत कोळी, प्रशांत पाटील, उदय पाटील यांनी या सन्मानित कार्यक्रमात आपला सहभाग घेतला.