---Advertisement---
राजकारण चाळीसगाव महाराष्ट्र

आ. मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने रस्त्यांसाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : ४ एप्रिल २०२३ : आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने तालुक्यातील रस्त्यांसाठी २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

MAL mangesh chavhan jpg webp

चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक – स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सदर रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेर गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली असून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने सदर रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

---Advertisement---

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरी कॉक्रीटीकरण कामाचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या अवर सचिवांनी याबाबत दि.३१ मार्च रोजी पत्र काढून सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता यांना सदर कामाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे

दरम्यान, या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड ते घाट रोड हा चाळीसगाव शहरातील मुख्य रस्ता आहे. मात्र खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाची मलादेखील जाणीव होती. मागे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम आमदार निधीतून केले होते. तसेच खरजई नाका ते हॉटेल दयानंद पर्यंतच्या रस्त्याचे काम देखील नगरविकास निधीतून सुरू आहे. मात्र अतिशय रहदारीच्या व शहरातील मुख्य अश्या स्टेशन रोड रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी त्याचे कॉक्रीटीकरण करणे गरजेचे होते.

त्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळून उठऋ निधीतून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या सूचना जाणून घेत लवकरच सदर कामाला सुरुवात करण्यात येईल. केवळ रस्त्याचे कॉक्रीटीकरणच नव्हे तर सदर रस्त्याच्या दुभाजकांचे सुशोभीकरण आदी कामांचा देखील यात समावेश करण्यात येईल. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज वापरणार्‍या हजारो नागरिकांचा प्रवास केवळ सुसह्यच होईलच पण शहराच्या सौंदर्यात देखील भर घालण्याचा माझा मानस आहे. माझ्या मागणीची दखल घेत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय सडक व परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, नामदार गिरिशभाऊ महाजन यांचे मी चाळीसगाव वासीयांच्या वतीने मनापासून आभार मानतो असे आमदार मंगेश चौव्हाण म्हणाले

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---