जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत असून डोंबिवलीत एक रुग्ण आढळून आल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमायक्रॉनचे नवे ७ रुग्ण आढळून आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवडमधील ४४ वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला, त्यांचा ४५ वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि १७ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. २४ नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या त१८ वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.
डोंबिवली आणि पुणे शहराने राज्याची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.