---Advertisement---
गुन्हे भुसावळ

गणेश विसर्जनासाठी आलेल्या दाम्पत्याच्या ओमनीने घेतला पेट ; भुसावळातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२३ । आज गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जात असून याच दरम्यान, भुसावळ येथे गणेश विसर्जनासाठी आलेल्या दाम्पत्याच्या ओमनी कारला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी घडलीय. सुदैवाने या गाडीत कोणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे.

omini pet jpg webp

भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आज सकाळपासूनच गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असून जुना सातारा भागातील गोपाळ भंगाळे हे आपल्या कुटुंबासह भगवान परशुराम मंदिराचे बाजूने गणेश विसर्जनासाठी ओमनी कारमधून आले होते. त्यांनी नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या गॅसवर चालणार्‍या ओमनी गाडीला सेल देताच या गाडीतील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर क्षणार्धात कारने पेट घेतला.

---Advertisement---

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या गाडीत कोणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे व बाहेरून देखील ऊन असल्यामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.दरम्यान, या अपघातात गोपाळ भंगाळे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---