---Advertisement---
महाराष्ट्र

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याला इशारा : केंद्राने सुचविल्या ८ महत्वाच्या सूचना

corona (2)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । देशात ओमिक्रॉनची (Omicron) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये 220 पर्यंत रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी राज्य सरकारांना एक पत्र लिहून इशारा दिला आहे. तसेच संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन डेल्टापेक्षा तीनपट जास्त संसर्गजन्य आहे.

corona (2)

मंगळवारी महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनच्या सर्वाधिक केस आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे टेन्शन वाढले आहे. राजेश भूषण यांनी राज्यांना चाचण्या वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच कोरोनाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून स्थानिक आणि जिल्हा स्तरावर कठोर आणि जलद पावले उचलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

---Advertisement---

काय आहेत केंद्राच्या सूचना!

  1. आरोग्य सचिव म्हणाले की, स्थानिक आणि जिल्हास्तरावर त्वरित निर्णय आणि कठोर कारवाईची गरज आहे. हे केल्याने ओमिक्रॉनचा संसर्ग कमी होऊ शकतो.
  2. पुढे बोलताना आरोग्य सचिव म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथे टेस्टिंग वाढवणे खूप आवश्यक आहे.
  3. ज्या जिल्हांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. तिथे रुग्णालयांमध्ये कोविड-19 शी संबंधित सर्व उपलब्ध सुविधांची खात्री करण्यात यावी.
  4. कठोर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा आणि गरजेनुसार स्थानिक पातळीवर रात्री कर्फ्यू सारखे निर्बंध देखील लावा. याशिवाय मोठ्या मेळाव्यावर बंदी आणा आणि लग्नासारख्या समारंभात लोकांची संख्या कमी करा.
  5. सर्व रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अधिसूचित आयसोलेशन झोन यांचाही लवकरात-लवकर आढावा घ्या.
  6. सर्व पॉझिटिव्ह लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अनिवार्य आहेच.
  7. डेल्टा केस अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये आहेत. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा जबाबदार असल्याचे मानले जात होते.
  8. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व राज्यांना लसीकरण वाढवून 100% लसीकरण कव्हरेजचे लक्ष्य पूर्ण करण्यास सांगितले आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---