⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आढळला प्रौढाचा मृतदेह

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आढळला प्रौढाचा मृतदेह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा देवळी शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तुकाराम धर्मा महाले (वय- ४६ रा. उंबरखेड) असे मृत प्रौढाचे नाव आहे.  याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. 

 

तुकाराम धर्मा महाले (वय- ४६ रा. उंबरखेड) ता. चाळीसगाव आपल्या पत्नी व मुलांबरोबर येथे वास्तव्यास होता. तुकाराम महाले हा लहानपणापासून मनोरूग्ण होता. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होता. तो आपला मामा रमेश बागूल रा. वरखेडे यांच्या सलूनच्या दुकानात कामाला जात असे. दि. २ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास तुकाराम महाले हा कामासाठी वरखेडे येथे गेले असता घरी परतलाच नाही. शोधाशोध केली असता मिळून आला नाही. म्हणून चुलत भाऊ रोहित महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात हरवल्याची खबर ५ मार्च रोजी देण्यात आली होती.

 

दरम्यान तालुक्यातील उंबरखेड शिवारातील देवळी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत ९ मार्च रोजी एका इसमाचे मृतदेह असल्याचे दिसून आले. परिसरात एकच खळबळ उडाली असून याच विहीरीतून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत कुणाल महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.