जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील पिंप्री येथील तापी नदी पात्रात रावेर येथील ७१ वर्षीय इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. विलास दामोदर भावे (वय ७१) असे मृताचे नाव आहे.
रावेर येथील गांधी चौक, भोई वाडा येथील रहिवासी विलास भावे यांनी पिंप्री नांदू पुलावरून उडी घेवून आत्महत्या केल्याचे दुपारी नदीपात्रात आढळून आले. मृताचे भाऊ प्रकाश भावे यांनी ओळख पटल्यानंतर येथील पोलिस ठाण्यात त्यांनी खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, कॉन्स्टेबल अब्बास तडवी, ज्ञानेश्वर पाटील यांनी पंचनामा करून ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप चौरे यांनी जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ऐनपूर येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आहे. भावे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तपास हेकाॅ ज्ञानेश्वर चौधरी करत आहेत.