⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून वृद्धाने स्वत:च्या हातावर केले ब्लेडने वार

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून वृद्धाने स्वत:च्या हातावर केले ब्लेडने वार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरात एका वृद्धाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना जळगाव शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. हाताची नस कापून वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुरेश रघुनाथ पांडे (वय, ७२) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे हे वास्तव्यास असून त्यांनी सोमवारी शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील बाकावर बसलेले असताना सुसाईड नोट लिहीत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करुन घेतले. ही घटना उद्यानातील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.

शहर पोलीस ठाण्याचे संजय बडगुजर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुरेश पांडे यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती बरी असल्याचं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. घटनेनंतर पोलिसांनी पांडे यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन त्यांना घटनेची माहिती दिली. सुरेश पांडे यांचा मुलगा जिल्हा रुग्णालयात आला असता, पांडे हे मनोरुग्ण असून त्यातून त्यांनी हा प्रकार केला असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं.

काय लिहिलं आहे सुसाईड नोटमध्ये :
पांडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये म्हटलं आहे की, ‘एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करत आहे. यात कोणीही दोषी नाही. मला ९० टक्के दिसत नाही. या आजारपणाचा आता कंटाळा आला आहे. मी स्वत: जबाबदार आहे, धन्यवाद,’ असं आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुरेश पांडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आढळून आलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.