⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

1986 मध्ये बुलेटची किंमत किती होती? किंमत पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२३ । इंटरनेटच्या जगात कधी, कुठे, काय व्हायरल होईल याचा नेमच नाही. अनेकवेळा इंटरनेटवर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी काही फोटो. अशातच बुलेटचं एक बील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला आवडणारी आणि सध्या लाखोंमध्ये किंमत असणारी बुलेटची किंमत आजपासून तब्बल 37 वर्षांपूर्वी म्हणजेच, 1986 मध्ये किंमत काय होती? व्हायरल होणाऱ्या या बीलनं बुलेटप्रेमींना आश्चर्यचकीत करुन सोडलं आहे.

Royal Enfield Bullet 350 ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या बुलेटची बाजारातील किंमत दीड ते दोन लाखांच्या पुढेच आहे. अनेक तरुण ज्यावेळी बाईक घेण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांची पहिली पसंती ही बुलेटच असते. पण तुम्हाला माहीत आहे का? आजपासून तब्बल 37 वर्षांपूर्वी म्हणजेच, 1986 मध्ये आजची लाखोंच्या घरात असणारी बुलेट फक्त आणि फक्त 19 हजार रुपयांना मिळत होती.

काय बसला ना धक्का? तुम्हाला आवडणारी आणि सध्या लाखोंमध्ये किंमत असणारी बुलेट फक्त 19 हजार रुपयांना मिळत होती. अजुनही तुमचा विश्वास बसत नसेल, तर हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं बील पाहा. यामध्ये Bullet 350cc ची किंमत फक्त 18,700 रुपये असल्याचं लिहिलंय. दरम्यान, सध्या बाजारात ‘रॉयल एनफिल्ड बुलेट 350 सीसी’ची सुरुवातीची किंमत 1.60 लाख रूपये इतकी आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे बील 23 जानेवारी 1986 मधील आहे. तसेच, हे बील झारखंडमधील कोठारी मार्केटमध्ये असणाऱ्या एका अधिकृत डिलरचं असल्याचं सांगितलं जात आहे. बीलवर लिहिलेल्या माहितीनुसार, 1986 मध्ये ‘रॉयल एनफिल्ड बुलेट 350 सीसी’ची ऑनरोड किंमत 18,800 रुपये होती. जी डिस्काउंटसह 18,700 रुपयांना विकली गेली.