---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

आनंदाची बातमी! जळगावसह भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा असलेल्या ‘या’ विशेष गाडीला मुदतवाढ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२३ । दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशी परतीच्या प्रवासावर आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. याच दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे. अशातच आता पश्चिम रेल्वेद्वारे चालविण्यात येणारी ओखा- मदुराई-ओखा विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाडीला जळगावसह भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

train 1 jpg webp

सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. रेल्वे गाड्यांमध्ये अद्यापही प्रवाशांची गर्दी कायम आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात गाडी क्रमांक ०९५२० ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष गाडीला २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९५१९ मदुराई – ओखा साप्ताहिक विशेष गाडीला ०१ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

---Advertisement---

या स्थानकांवर आहेत थांबा :
ही गाडी द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, ह.साहिब नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, महबूबनगर डॉन, गूटी , रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली, मानापराई, दिंडीगुल, कोडाईकनाल रोड आणि कुडालनगर स्टेशन.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---