जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । अलीकडे इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड आहे. त्यातही चारचाकी गाड्यांपेक्षा दुचाकीला जास्त मागणी आहे. ग्राहकांची हीच पसंती लक्षात घेऊन अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणत आहेत. नुकतीच ओडिसी कंपनीने भारतात आपली इलेक्ट्रिक बाइक VADER लाँच केली आहे. या बाइकची बुकिंग देखील सुरू झाली आहे. अवघ्या ९९९ रुपये किंमतीत बुक करता येऊ शकते.
ओडिसी इलेक्ट्रिक व्हेईकलने भारतात आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे.
या बाईकची किंमत १ लाख ९ हजार ९९९ रुपये एक्स शोरूम, अहमदाबाद आहे. विशेष म्हणजे, ही गाडी भारतात तयार करण्यात आली आहे. याचे बुकिंग करण्यासही सुरुवात झाली आहे. हे बुकिंग ऑनलाइन किंवा फक्त ९९९ रुपयाच्या टोकन अमाउंटवर करता येणे शक्य आहे. प्रत्यक्षात ही गाडी जुलैपासून मिळणार आहे.
या गाडीत ३००० वॉट्सची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. तसेच याचा स्पीड ८५ किमी प्रति तास आहे. यात तीन ड्रायविंग मोड ३ फॉरवर्ड, रिव्हर्स आणि पॅकिंग देण्यात आले आहे. यात कॉम्बो ब्रेकिंग सिस्टम सोबत २४० मिमीचे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. चार्जिंगसाठी यात लिथियम-आयन बॅटरी आहे. अवघ्या चार तासात ती पूर्ण चार्ज होते.
ही गाडी ५ रंगात उपलब्ध आहे. मिडनाईट ब्लू, फियरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, वेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे हे पाच रंग आहेत. ही देशातील पहिली इलेक्ट्रिक बाइक आहे. ज्यात ७ इंची अँड्रॉइड डिस्प्ले दिला आहे. यात गुगल नॅव्हिगेशन, ओटीए अपडेट, ब्लूटूथ मिळते. यात एलईडी लायटिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमही आहे. ओडिसी वेडर इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरीवर ३ वर्षाची वॉरंटी तर इलेक्ट्रिक मोटरवर ३ वर्षाची वॉरंटी दिली आहे.