NTPC मध्ये निघाली बंपर भरती ; 1.4 लाख रुपये पगार मिळेल, पात्रता तपासून घ्या?

फेब्रुवारी 12, 2026 6:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने अभियांत्रिकी पदवीधरांसाठी भरतीची घोषणा केली आहे. NTPC ने “अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी” च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेत ५१५ पदे भरली जातील.

ntpc 1

या नोकरीचे प्रमुख आकर्षण म्हणजे आकर्षक पगार आणि देशातील सर्वात मोठ्या वीज कंपनीसोबत काम करण्याची संधी. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी पर्यंत आहे.

Advertisements

रिक्त पदांचा तपशील :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
मेकॅनिकल इंजिनिअरिंग
सिव्हिल इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग
कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी

Advertisements

शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेत बीई/बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि ओबीसी प्रवर्गासाठी किमान ६५% गुण आवश्यक आहेत, तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी ५५% गुण आवश्यक आहेत.
गेट २०२५ स्कोअर: ही भरती फक्त गेट २०२५ परीक्षा देणाऱ्यांसाठी आहे. गेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा: सामान्य प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट मिळेल.

इतका मिळेल पगार?
निवडलेल्या उमेदवारांना E1 ग्रेडमध्ये नियुक्त केले जाईल, ज्याचे वेतन ₹४०,००० ते ₹१४०,००० पर्यंत असेल. त्यांना कंपनीच्या नियमांनुसार डीए, एचआरए आणि इतर भत्ते देखील मिळतील.
परीक्षा शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now