---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

आता शालेय बसच्या दरवाढीची घोषणा; पालकांना मोजावे लागणार अधिकचे पैसे

school bus
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२५ । नुकतीच राज्यात एसटी बससह रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढले असून यानंतर आता विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शालेय बससाठी पालकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

school bus

कारण स्कूल बस ओनर्स असोसिएशनने राज्यात १८ टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच येत्या १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

---Advertisement---

सध्या पार्किंग शुल्क दुप्पट झाले आहे. बस देखभाल-दुरुस्ती खर्चात वर्षाला १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही आणि इतर उपकरणे बसवणे अनिवार्य केले. या खर्चाचा भार बसचालक, मालकांवर आहे. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून १८ टक्के दरवाढ विद्यार्थी वाहतुकीत होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---