⁠ 
रविवार, मे 19, 2024

रात्री नव्हे, भरदिवसा फोडली पाच घरे, ७ लाखांचा ऐवज लुटला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । भुसावळ‎ शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल‎ मागील पीयूष कॉलनीत रविवारी‎ दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान बंद घर‎ फोडून १० तोळे साेने, पाच हजार‎ रूपये रोख आणि चांदीचे दागिने,‎ तर तुकाराम नगरात साई जीवन‎ फ्लॉट फेज-२ मध्ये एकाच ‎अपर्टामेंटमध्ये चार घरे फोडली. ही ‎ ‎ घटना देखील रविवारी दुपारी‎ घडली. या पाचही ठिकाणी मिळून ‎सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने‎ आणि ११ हजार रूपये रोख असा ‎मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, भर ‎दिवसा झालेल्या या चोऱ्यांमुळे‎ रहिवासी घाबरले आहेत.‎

रविवारी पीयूष काॅलनीतील‎ रहिवासी तथा खडका येथे मेडिकल ‎असलेले मनाेज भास्कर काेल्हे हे ‎ ‎ परिवारासह दुपारी २ वाजता मंदिरात‎ गेले हाेते. लगेच परत येणार‎ असल्याने त्यांनी बाहेरील मुख्य ‎दरवाजाला कुलूप लावले नाही. ते‎ ४.१५ वाजता मंदिरातून घरी परत ‎आल्यावर दरवाजा उघडा दिसला. ‎यानंतर चाेरी झाल्याचे लक्षात येताच ‎बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक ‎राहूल गायकवाड, हरीश भाेये,‎ सचिन चौधरी यांनी घटनास्थळी‎ पाहणी केली. चोरट्यांनी सुमारे १०‎ तोळे सोन्याचे दागिणे, चांदीचे‎ दागिने आणि पाच हजार रूपये रोख ‎असा मुद्देमाल लांबवल्याचे कोल्हे‎ यांनी पोलिसांना सांगितले. अवघ्या‎ ‎दोन तासांत चोरट्यांनी त्यांच्या‎ घरात हात साफ केला. दरवाजाचे‎ कुलूप ही लांबवणाऱ्या चोरट्यांनी‎ घरातील शौचालयात मात्र‎ अस्वच्छता करून ठेवली होती.‎ यामुळे संताप व्यक्त झाला.‎

एकाच अपार्टमेंटमध्ये बंद घरात घातला धुमाकूळ‎
चोरट्यांनी साईजीवन फ्लॉट फेज २ मध्ये अपार्टमेंटमधील रहिवासी‎ चंद्रशेखर विश्वकर्मा यांचे घर फोडले. यानंतर येथेच दोन घरे‎ फोडली. गणपत पांडुरंग ठाकूर हे गाेदावरी फाउंडेशनमध्ये नाेकरीला आहे. ते‎ दुपारी १२.३० वाजता मुलीला क्लासला साेडण्यासाठी गेले हाेते. चोरट्यांनी‎ त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा काेयंडा ताेडून आत प्रवेश केला. घरातील‎ पाच हजार रूपये आणि त्यांच्या मुलीचे दागिने लांबवले. यानंतर चोरट्यांनी‎ याच अपार्टमेंटमधील रहिवासी तथा इलेक्ट्रीशियनची कामे करणारे भरत‎ विठ्ठल काेळी यांचे बंद घर फोडले. कोळी हे कामावर तर त्यांच्या पत्नी घर‎ बंद करून बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या दरवाजाचे कुलूप ताेडून घरात‎ शिरलेल्या चोरट्यांनी एक हजार रूपयांची रक्कम लांबवली.‎

पांढऱ्या कारमध्ये आले चाेरटे
भर दुपारी साई जीवन फ्लॉट फेज-२ मधील बंद घरांना लक्ष करणारे चोरटे‎ कारमधून आले होते, अशी माहिती समोर आली. ही घटना झाली तेव्हा काही लहान मुले अपार्टमेंटमध्ये खेळत‎ होती. त्यांच्या माहितीनुसार एक पांढऱ्या रंगाची कार अपार्टमेटसमाेर येऊन थांबली. त्यातून दाेन-तीन लोक उतरले.‎ ते काेणाकडे गेले माहिती नाही. मात्र, काही वेळातच ते परत गेले. त्यामुळे चाेरटे हायफ्राेफाईल असावे, असा‎ अंदाज समोर आला. त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.‎

विश्वकर्मा यांच्या घरी‎ चाेरी‎
शहरालगतच्या तुकाराम नगरातील‎ साई जीवन फ्लॉट फेज-२ येथे ए‎ आणि बी असे दाेन विंग‎ आहेत. यापैकी ए विंगमधील‎ रहिवासी चंद्रशेखर सिताराम‎ विश्वकर्मा हे फर्निचरचे काम‎ करतात. घरातील सदस्य‎ नातेवाईकांकडे गेल्याने ते दुपारी‎ १२.३० वाजता घराला कुलूप लावून‎ बाहेर गेले. ही संधी साधून‎ चोरट्यांनी ए विंगला चौथ्या‎ माळ्यावरील रहिवासी विश्वकर्मा‎ यांच्या दरवाजाचा काेयंडा ताेडून‎ घरात प्रवेश केला. कपाटात‎ ठेवलेली सोन्याची चैन, अंगठी,‎ लॉकेट असे सुमारे तीन लाख‎ रूपयांचे दागिने लांबवले. विशेष‎ म्हणजे याच ठिकाणी एका‎ प्लास्टिकच्या पिशवीत रोख रक्कम‎ होती. ती चाेरट्यांच्या नजरेस न‎ पडल्याने तशीच पडून हाेती. घरात‎ चोरी झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी‎ विश्वकर्मा यांना दिली.‎