सोमवार, डिसेंबर 11, 2023

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही – किरीट सोमय्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे. आशी प्रतीक्रीया माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीटर द्वारे दिली आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा वादग्रस्त व्हिडीओ सद्ध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त कली असुन किरीट सोमय्यांवर जोरदार कारवाईची मागणी केली आहे. यावरुन सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहले आहे.

या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले आहेत की, , “देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.” “मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,”असेही ते म्हणाले आहेत.